हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही ! : कुलगुरूंच्या वक्तव्याने वाद

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित या पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आंबेडकरांचे लैंगिक न्यायाबद्दलचे विचार: समान नागरी संहिता डीकोडिंग या विषयावर व्याख्यान देताना कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी केलेली वक्तव्ये वादाच्या भोवर्‍यात सापडलेली आहेत. त्या म्हणाल्या की, मानवजातीच्या विज्ञानानुसार देव-देवता उच्च जातीच्या नसतात. मनुस्मृतीत महिलांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला होता.

दरम्यान, याप्रसंगी त्या पुढे म्हणाल्या की, मानववंशशास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही. बरेचसे देव क्षत्रिय आहेत. भगवान शिव हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावे, असा माझा अंदाज आहे. कारण ते एका स्मशानभूमीत सापासह बसले आहेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील, असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की मानवशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीतून आलेले नाहीत. मग आपण हा भेदभाव करतो. हे अत्यंत अमानवीय आहे., असे त्या म्हणाल्या.

Protected Content