शिवाजी विद्यापीठातील इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह शहरातील पुरोगामी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवल्यानंतर वाद टाळण्यासाठी कोल्हापुरातील हभप इंदुरीकरांनी कार्यक्रम रद्द केल्याची वृत्त समोर आले आहे.

 

आज संध्याकाळी कोल्हापुरात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता. यामुळे वादंग निर्माण झाला. तर दुसरीकडे हिंदु संघटनांनी कार्यक्रम व्हायला पाहीजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचणे शक्य नसल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह शहरातील पुरोगामी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवल्यानं वाद टाळण्यासाठी इंदोरीकरांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे हा कार्यक्रम रद्द केला नसून तुर्तास स्थगित केला असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले आहे.

Protected Content