Home Cities जळगाव भुसावळात इनरव्हीलतर्फे मधूमेह विषयावर व्याख्यान

भुसावळात इनरव्हीलतर्फे मधूमेह विषयावर व्याख्यान


भुसावळ प्रतिनिधी । येथील इनरव्हील क्‍लब ऑफ रेल सिटीतर्फे मधूमेह प्रतिबंध विनासायास वेट लॉस या विषयी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन पेढांळकर यांनी मार्गदर्शन केले.

या शिबीरास भुसावळकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, क्लबच्या अध्यक्षा डॉ.मृणाल पाटील, सचिव मोना भंगाळे, कोषाध्‍यक्षा रेवती मांडे, आयएसओ प्रतिक्षा पाटील, सी.सी पल्लवी-वारके, कविता पाचपांडे, वंदना नेमाडे, योगिता वायकोळे, किरण जावळे, आदिती भंडग, हेमलता सोनार, सिमा सोनार, भारती वानखेडे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound