खडसेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली !

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीने चौकशी केली असून याच्या विरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यावर उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. तथापि, एकनाथराव खडसेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. या अनुषंगाने या याचिकेवरील पुढील सुनावणी आता १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Protected Content