चोपडा तालुक्याचे भाजप संघटन मजबूतच राहिले पाहिजे-आ. भोळे

चोपडा  प्रतिनीधी – एका बाजूला तीन सत्ताधारी पक्ष असताना नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत चांगले यश अापण प्राप्त केले याच प्रकाराने तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश तथा राजूमामा भोळे यांनी येथील पक्षाच्या कार्यालयात बुथ प्रमुख व शक्ती प्रमुखांच्या बैठकीला संबोधित केले.

याप्रसंगी माजी जि.प.सदस्य जेष्ठ नेते शंाताराम पाटील,जिल्हा पदाधिकारी अजयभोळे,डॅा.विजय धांडे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल, नाशिक विभागाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा चिटणीस राकेश पाटील,भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, तालुका सरचिटणीस हनुमंत महाजन,सूतगिरणी संचालिका रंजना नेवे,दिपक बाविस्कर हे मंचावर उपस्थित होते.तर बैठकिला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

महावितरणाला टाळे ठोको आंदोलन

महावितरण विरोधात चोपडा शहरातील शिरपूर रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या कार्यालयावर आज दि.५ रोजी सकाळी ११ वाजता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने वीज ग्राहक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

 

 

Protected Content