एचडीएफसी बँकेतर्फे ‘एमसीएलआर’ कपात

HDFC bank

 

मुंबई वृत्तसंस्था । खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे. एचडीएफसी बँकेने व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून बँकेने सर्वच कालावधीसाठी एमसीएलआरचे दर कमी करण्याची घोषणा नुकतीच केली आहे.

बँकेने एमसीएलआरच्या दरात ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. बँकेच्या या निर्णयाने ग्राहकांना दिलासा मिळणार असून आता गृहकर्ज, दुचाकी आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरांमध्ये कपात करण्यात येणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात एचडीएफसी बँकेने सर्वच कालावधीसाठी एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात केली होती. तसेच नवे दर ७ डिसेंबरपासून लागू करण्यात आली असल्याची माहिती बँकेने आपल्या वेबसाईटवरून दिली आहे. यापूर्वी स्टेट बँकेने एका वर्षासाठी एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. १० डिसेंबरपासून स्टेट बँकेचे नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँकेचा एमसीएलआर ८ टक्क्यांवरून ७.९० टक्क्यांवर आले आहे.

Protected Content