महामार्गावरील हॉकर्संची पर्यायी जागेसाठी उपमहापौरांकडे धाव (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 07 25 at 3.09.30 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरात रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्याने ‘न्हाई’ च्या अधिकाऱ्यांनी बहिणाबाई चौधरी उद्यान व आय. आय. टी. आय. परिसरातील हॉकर्स बांधवांना तेथून दोन दिवसात जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मिळताच हॉकर्स बांधवांनी महापालिकेत धाव घेऊन आम्हाला पर्यायी जागा द्यावी अशी मागणी उपमहापौर डॉ. अश्विन सोनावणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेतर्फे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांना निवेदन देण्यात येऊन व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरूपात टाइम झोन मध्ये जागा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी केली. उपमहापौर यांनी पर्यायी जागेसंदर्भात व टाइम झोन संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निणर्य घेतला जाईल असे मत व्यक्त केले.  निवेदनाचा आशय असा की, मागील ३० वर्षापासून सागर पार्क व बहिणाबाई उद्यान या ठिकाणी हॉकर्स बांधव व्यवसाय करत होते परंतु ११ मार्च २०१६ रोजी महापालिकेचे तत्कालीन अधिकाऱ्यांनीच स्थलांतरित करून महामार्गावर व्यवसाय करण्यासाठी सांगितले. मागील ३ वर्षापासून येथे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत होते. परंतु, महामार्ग चौपदरीकरण कामी महामार्गाच्या अधिकारी यांनी त्यांना दोन दिवसात जागा खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे हॉकर्स बांधवांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. हे सर्व हॉकर्स नोंदणीकृत असून मनपाचे सगळे सर्व नियम व निकष ठरवून दिलेले सर्व पळत आलेले आहेत. तसेच व्यवसाय करतांना व्यवसायाची व्यवसाय परिसराची कायम स्वच्छता ठेवत असतात. तरी सर्व हॉकर्स बांधवांना महामार्ग चौपदरीकरणाचे काम होई पर्यंत बहिणाबाई उद्यान व सागर पार्क याठिकाणी टाईम झोनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी हॉकर्स बांधवांनी उपमहापौर डॉ. सोनवणे यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुनील सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव मोहन अंबिका प्रसाद तिवारी, सुनील जाधव, गोकुळ पाटील, राधेश्याम पाटील, रवींद्र बोरसे, विलास फुले, शुभम जैन, रविकांत मराठे, मांगीलाल प्रजापत, मनोज प्रजापती, कन्हैया चौधरी, अश्फाक शेख,संजय सोनार, विजय चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content