अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण

sachdeav

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यात व्यापारी महामंडळाच्या वतीने आज दि. 25 जुलै रोजी अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधी साहित्य अकादमीचे महाराष्ट्राचे कार्यध्यक्ष ना. गुरुमुख जगवानी याच्या हस्ते औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण करण्यात आले.

अमृतराज सचदेवाप्रमाणे मी देखील जळगाव जिल्हा नव्हे तर राज्यातील व्यापारी बांधवांच्या समस्यासाठी केव्हाही हजर आहे. जीएसटीत आज मोठा बदल वाटत असला तरी येणाऱ्या दिवसात व येणाऱ्या पिढीला त्याचा निश्चित याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच जळगाव जिल्हयाच्या व्यापाऱ्यांच्या समस्यासाठी केव्हाही हाक मारा मी तयार आहे. वैद्यकीय सेवेत मोठं काम करता येईल, यासाठी व्यापारी बांधवाना जळगावात वैद्यकीय बाबत केव्हाही संपर्क करा असे आवाहन ना. गुरुमुख जगवानी यांनी वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलताना सागितले. याचबरोबर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जळगाव जिल्हा नव्हे तर खान्देशातमध्ये कोणत्याही व्यापारी बांधवाना अडचणी आल्या तर त्यांनी तालुक्यातील व्यापारी महामंडळाला संपर्क करावा असे आवाहन अमृतराज सचदेव यांनी केले. यावर्षी वाढदिवसाच्यानिमित्ताने व्यापारी बांधव शहर व तालुक्यात ‘एक हजार वृक्ष जगविणार आहेत’. त्यांची चांगली सुरुवात झाली असून वरूण राज्याने देखील आज तालुक्यावर मेहरबानी केल्याचे अमृतराज सचदेव यांनी सांगितले.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, जळगाव महानगरपालिका नगरसेवक मनोज आहुजा, प्रसिध्द व्यापारी बण्णाराम शामनानी, चोपडा नगरपालिका गटनेते जीवन चौधरी, एमआयडीसीचे चेअरमन अनिलकुमार शर्मा, व्हाईस चेअरमन महेंद्र सोनार, प.स. सभापती आत्मराम म्हाळके, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष संजय श्रावगी, सुनील बरडीया, राजेंद्र जैन, नरेंद्र तोतला, अनिल वानखेडे, प्रवीण पाटील, सनी सचदेव, श्याम सोनार, संजय शर्मा, अनिल अग्रवाल, मनोज सचदेव, श्यामसिंग परदेशी, प्रवीण जैन, जितेंद्र बोथरा, गोपाल पाटील, कमलेश जैन, नितीन अहिरराव, पप्पू स्वामी, रवी अंदानी आदी व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी कर्यक्रमाचे सूत्रसंचलन सुशील टाटीया यांनी केले.

Protected Content