लेफ्टनंट कर्नल धोनी काश्मिरात घालणार गस्त

MS Dhoni with Army

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची काश्मीरमध्ये नेमणूक झाली आहे. ३१ जुलैला तो १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) रुजू होणार असून, तो गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे.

 

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंतच्या काळात लेफ्टनंट कर्नल (मानद) धोनी 106 टी.ए.बटालियनमध्ये सामील होणार आहे. व्हिक्टर फोर्सचा भाग असलेल्या या युनिटची पोस्टिंग काश्मीर खोऱ्यात असणार आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि लष्कर मुख्यालयाकडून मिळालेल्या मान्यतेनंतर धोनी पेट्रोलिंग(गस्त) गार्ड आणि पोस्ट ड्युटी यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळेल आणि सैनिकांसोबतच राहील.

Protected Content