तरूणीची छेडछाड प्रकरणातील फरार रिक्षाचालकाला अटक

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । मद्यधुंद तरूणाने रिक्षात एका तरूणीची छेड काढल्याची घटना बुधवारी घडली होती. यातील संशयित आरोपींचा फरार असलेला साथीदार रिक्षाचालकाला गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता शहर पोलीसात अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली होती.

अशी होती घटना
यावल तालुक्यातील आडगाव-कासारखेडे येथील एक विद्यार्थिनी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षात शिकत आहे. ती महाविद्यालयातील क्लास संपल्यानंतर ती घरगुती साहित्य घेण्यासाठी दाणा बाजारात गेली होती. झाडू व इतर घरगुती साहित्य खरेदी केल्यानंतर गावी जाण्यासाठी तिला बसस्थानकात येण्यासाठी रिक्षाचालक समिर खान अमजत खान यांच्या क्रमांक एमएच 19 सीडब्ल्यू 1596 रिक्षात बसली. याच वेळी संशयित आरोपी नदीम मेहमूद पिंजारी (वय 28)रा. हरविठ्ठल नगर हा देखील बसला होता. रिक्षातून येत असतांना नदीम हा तरूण तिच्याकडे एकटक बघत होता. तर एसपी कार्यालयासमोर त्यांने तरूणीच्या खांद्यावर हात ठेवून जवळ ओढले. तीने आरडाओरड करत रिक्षा चालकाला रिक्षा थांबविण्यास विनंती केली. मात्र रिक्षा चालक समिर याने रिक्षा थांबविली नाही. याचवेळी दुचाकीने जाणाऱ्या एका तरूणाने तरूणीची सुटका करत थेट आरोपीला जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात दिले. याबाबत तरूणासह रिक्षाचालकाविरोधात छेडछाड प्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या घटनेनंतर रिक्षाचालक समिर खान हा रिक्षा घेवून फरार झाला होता. जिल्हा पेठ पोलीसांचे कर्मचारी प्रशांत जाधव, नाना तायडे आणि अविनाश देवरे यांनी आज मध्यरात्री 2 वाजता रिक्षाचालक समिर खान याला रिक्षा सह खंडेराव नगरातून अटक केली आहे. या प्रकरणात त्याची कसुन चौकशी करण्यात येत आहे.

Protected Content