Home Cities अमळनेर वासरे येथे कानुबाईची उत्सहात मिरवणूक (व्हिडिओ)

वासरे येथे कानुबाईची उत्सहात मिरवणूक (व्हिडिओ)

0
26

अमळनेर- गजानन पाटील | तालुक्यातील वासरे येथे प्रथमच गावातील नवयुवकांनी तीन दिवसीय कानुबाई उत्सवाचे आयोजन केले आहे.कालपासूनच या उत्सवास सुरुवात करण्यात आली आहे. आज काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आबालवृद्धांनी मोठ्या उत्सहात सहभाग घेतला.

 

तीन दिवशीय कानुबाई उत्सवात गवरणी आणणे, रास पूजने, गहू दळणे तसेच ध्वज लावणे, पाणी आणणे, तसेच सायंकाळी कानुबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली. उद्या सोमवार दि. १६ मे रोजी सकाळी आठ वाजता कानुबाई मातेचे विसर्जन होईल असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान वासरे गावात आज निघालेल्या शोभा यात्रेत पंचक्रोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी बाळ गोपाल यांच्यासह अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. महिला तसेच वयस्क मंडळींनी फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/515409990120486

 


Protected Content

Play sound