चंदीगढ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा राज्यात मुख्यमंत्री नायब सैनी यांची विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे. या सरकारचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरपर्यंत होता. परंतू आज १२ सप्टेंबर रोजी म्हणजेच ५२ दिवसापूर्वीच अधिवेशन बोलवू न शकल्यामुळे विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे. देशात एवढ्या घटनात्मक पेचप्रसंगानंतर विधानसभा विसर्जित करण्याची ही पहिलीच घटना आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने विधानसभा विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यानंतर राज्यपालांकडे शिफारस करण्यात आली. त्यानंतर हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी विधानसभा बरखास्त केली आहे.
राज्यातील सरकारच्या शिफारशीवरून ही अधिसूचना राज्यपालांनी जारी केली आहे. या अधिसूचनेत लिहिले आहे की, – “भारतीय राज्यघटनेच्या कलम 174 च्या खंड (2) च्या उपखंड (b) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत, मी, बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे राज्यपाल, हरियाणा विधानसभा तत्काळ विसर्जित करतो.” ही राज्याची १४ वी विधानसभा होती. सहा महिन्यांच्या कालावधीत विधानसभेचे अधिवेशन बोलावू न शकण्याचे घटनात्मक संकट टाळण्यासाठी हरियाणा सरकारने हे पाऊल उचलले.