यावल शहरवासीयांनी उत्साहाच्या वातावरणात दिला श्रीगणेशाला निरोप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातील २१ श्रीगणेश मंडळाच्या वतीने पाच दिवसाच्या श्रीगणेशाचे उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात सवाद्य निरोप देण्यात आले व याच बरोबर गणेश उत्सवाची सांगता झाली. यावल शहरातुन दुपार २ वाजे नंतर काढण्यात आलेल्या श्री ची विसर्जन मिरवणुक ही शहरातील महाजन गल्ली,म्हसोबा मार्ग, काजीपुरा मस्जिद चावडी मार्गाने होत कोर्ट रोड मार्गाने काढण्यात आलेल्या श्रीची विसर्जन ही रात्री उशिरा १२ वाजे पर्यंत पार मंडळानी श्री व्यास मंदीरा जवळ उभारण्यात आलेल्या कुंडात तर काही मंडळांनी तापी नदीवर श्रीचे विसर्जन करण्यात आले.

 

 

यावेळी प्रांतधिकारी बबनराव काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते व मंडळ अधिकारी मिना तडवी आणि त्यांचे कर्मचारी, फैजपुर विभागाच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या दोन पोलीस निरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांच्यासह तीन पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, शिग्रकृती दल पथक, गृहरक्षक दलाचे महिला व पुरुष कर्मचारी अशा ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शांतता राखण्याकामी आपला बंदोबस्त चोख पाळला. त्यांना शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान, विजय सराफ, गोपाळसिंग पाटील, हाजी गफ्फार शाह, हाजी इकबाल खान, उमेश फेगडे, प्रा.मुकेश येवले, राहूल बारी, पंकज सोनार, तुषार उर्फ मुन्ना पाटील (शिवसेना शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख, डॉ निलेश गडे, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, हाजी गुलाम रसुल मेंबर, समीर शेख मोमीन, हेमराज फेगडे, जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, योगेश चौधरी, कदीर खान, मनोहर सोनवणे अनिल जंजाळे, हाजी अय्याज खान यांच्यासह सर्व सदस्यांचे मोठे सहकार्य मिळाले .

Protected Content