मुंबईत भाजपा नेत्यांची बैठक

मुंबई प्रतिनिधी । आज मुंबई येथे भाजपाच्या प्रमुख नेत्यांची माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.गिरीश महाजन व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने ओबीसी समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळ काढू पणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे या उपस्थित होत्या आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण मागणीसाठी २६ जून रोजी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

या बैठकीलामाजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.गिरीशजी महाजन व माजी मंत्री पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, डॉ. संजयजी कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमारजी गोरे, योगेशजी टिळेकर, चित्राताई वाघ यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Protected Content