पाचोरा आयसीआयसीआय बॅकेत ५० रुपयांचे बंडल घेण्यास नकार

पाचोरा प्रतिनिधी । येथील आयसीआयसीआय बॅकेत आज ई-कॉम एक्सप्रेस या कुरिअर कंपनीची रोख रक्कम भरण्यासाठी कर्मचारी गेले होते. त्यांनी कॅशियरकडे ही रक्कम दिली ज्यामध्ये ५० रुपयांचा बंडल होते. ५० च्या नोटा पाहून बँकेच्या कॅशियरने पैसे स्वीकारण्यास नकार दिला.

याबाबत त्यास विचारले असता त्याने कुठलेही कारण न देता पन्नास रुपयांच्या नोटांचे चलन घेण्यास नकार दिल्याने ई कॉम एक्सप्रेस या कुरियर कंपनीच्या कर्मचारी हे आश्चर्य चकित झाले. त्यांना भरणा अर्जंट आणि महत्वाचा असलेल्याने त्यांनी सदर भरणा हा पाचोरा शहरातील एच. डी. एफ. सी च्या बॅंक शाखेत भरणा करावा लागला. सदर घटनेची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांना दिली असता सदर प्रस्तुत प्रतिनिधी ने पाचोरा आय. सी. आय. सी. आय. बॅंक शाखेतील बॅंक मॅनेजर यांना घडलेला प्रसंग सांगितला असता त्यांनी सुध्दा उडवाउडवीची उत्तरे दिली तरी अशा बेजबाबदार पणे काम करणारे आय. सी. आय. सी. आय. बॅंकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेवुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

 

Protected Content