बकालेंच्या बडतर्फीचे निर्देश लवकरच : मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गोत्यात येऊन निलंबीत झालेले जळगाव एलसीबीचे तत्कालीन प्रमुख किरणकुमार बकाले यांच्या बडतर्फीचे लवकरच निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सध्या जळगाव एलसीबीचे माजी प्रमुख किरणकुमार बकाले यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. या प्रकरणी आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी प्रेस नोट जारी करून माहिती दिली. यात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या महिलांबाबत अत्यंत असशील लज्जास्पद व अपमान जनक वक्तव्य करणार्‍या पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्यावर तातडीने अटक करण्याबाबत व त्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्ङ्ग करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाच्या स्वरूपात मी आज मागणी केली. सदर विषय अत्यंत गंभीरपणे लक्षवेधीत आहे ही जळगावचा पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सोशल मीडियावर मराठा समाजाच्या महिलाबाबत अत्यंत असशील लज्जास्पद व अपमान जन्म वक्तव्य करून अपमानित केले आहे.याबाबत समाजात प्रचंड असंतोष आहे आपण जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना आपल्याला अनेक निवेदन सुद्धा देण्यात आली होते बकाले वर गंभीर गुन्हा दाखल असतानाही व जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारूनही सुद्धा पोलीस यंत्रणा बकाले ला पाठीशी घालत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बंधू भगिनींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, किरणकुमार बकालेच्या विरोधात जळगाव शहरात प्रचंड मोर्चा सुद्धा काढण्यात आले सदर पोलीस अधिकारी बकाले यांनी केलेल्या बेलगाम वक्तव्यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील मराठा बांधव यांनी बकाले संदर्भात ङ्गोन करत बकाले बडतर्ङ्ग करण्याची मागणी मला दूरध्वनी द्वारे अशोकराव शिंदे, लक्ष्मण शिरसाट ,हितेश टकले , नंदू रायगडे, यांनी सदर प्रकरणाची माहिती मला यांना दिली. या प्रकरणाचा निषेध म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा जिल्हाभर सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी बकालेच्या बाबतीत तातडीने गंभीर कारवाई करून त्याच्या अटकेचे आदेश पोलीस दलात द्यावे अन्यथा या संदर्भामध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड गैरसमज निर्माण होईल. तरी मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरणकुमार बकाले याला तातडीने बडतर्फ करण्यात येईल. याबाबतचे निर्देश लवकरच जारी करण्यात येतील अशी माहिती दिली.

Protected Content