पालकमंत्र्यांनी दिले जिल्ह्यात कठोर निर्बंधाचे संकेत

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात कठोर निर्णयाचे संकेत दिले आहेत. याबाबत लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलतांना वेळ पडल्यास शाळा बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. आज ना. पाटील यांच्या हस्ते न्हावा-शेवा टप्पा तीन पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन होत आहे. याआधी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन लवकरच कठोर निर्बंधाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यात पाचवी ते सातवीच्या शाळा बंदीसह कठोर नियमांचे पालन करावे लागतील अशी शक्यता आहे. याबाबत आज निर्णय जाहीर होऊ शकतो.

Protected Content