चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विसापूर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी बदलापूर ठाणे येथे घरातील कौटुंबिक कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार २० जून रोजी दुपारी ४ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील विसापूर येथील माहेरा असलेल्या मीनाक्षी राहुल पवार वय-२५ यांचा विवाह बदलापूर ठाणे येथील राहुल शांतीलाल पवार यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. दरम्यान विवाहितेला लहान सहान गोष्टींवरून त्रास देणे सुरू केले, त्यानंतर लग्न आमच्या मर्जीप्रमाणे लावले नाही, असे सांगून तिला टोमणे मारणे सुरू केले. तसेच सासरे, सासू, दीर यांनी देखील शारीरिक व मानसिक त्रास दिला. दरम्यान हा त्रास सहन झाल्याने विवाहिता माहेरी विसापूर येथे निघून आल्या. त्यानंतर गुरुवारी २० जून रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने मेहूणबारे पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती राहुल शांतीलाल पवार, सासरे शांतीलाल गंगा पवार, सासू उषा शांतीलाल पवार, जेठ अमोल शांतीलाल पवार सर्व रा. बदलापूर ठाणे यांच्या विरोधात मेहुनबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन सोनवणे करीत आहे.