शिरसोली-वावडदा रस्त्यावर दुचाकी अपघातात प्रौढाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शेतात जात असलेल्या पादचारी प्रौढास दुचाकीने धडक दिली. या अपघातत प्रौढाचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ वाजता शिरसोली ते वावडदा दरम्यान ही घटना घडली.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जगन नारायण सुन्ने (वय ५५, रा.शिरसोली) हे सोमवारी शेतात जात होते. त्यासाठी ते काही अंतर ट्रॅक्टरमध्ये बसुन आले. यानंतर पायी चालत शेताकडे जात असताना एका भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत सुन्ने हे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांना मृत्यू झाला. तर सुन्ने यांना धडक देणारा दुचाकीस्वार देखील अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा दुचाकीस्वार धानवड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सुन्ने यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करुन मृतदेह कुटंुबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content