Home क्राईम वरणगाव पोलीसांची गावठी हातभट्टीवर धाड

वरणगाव पोलीसांची गावठी हातभट्टीवर धाड

0
111

वरणगाव प्रतिनिधी । तापी नदी काठावर असलेल्या सावतर निंभोरा येथे गावठी हातभट्टीवर वरणगाव पोलीसांनी धाड टाकून दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले आहे. 

वरणगाव येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी आज रविवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सावतर निंभोरा येथे धाड टाकून हातभट्टी दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे.   अनेक ठिकाणी देशी दारू बनवण्याच्या भट्ट्या सुरू आहेत नव्याने रुजू झालेले वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी आज धाडसत्र सुरू करून  सावतर निंभोरा येथील  गावठी देशी दारूचा कारखाना आज उध्वस्त करण्यात आला यामध्ये जवळपास 1 हजार 600 लिटर देशी दारू रसायन  नष्ट करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी दिली आहे.

 


Protected Content

Play sound