बोदवड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

crime

बोदवड, प्रतिनिधी | शहरात आज २४ सप्टेंबर रोजी न. ह. रांका हायस्कूल मध्ये शिकत असलेली पीडित अल्पवयीन मुलगीस शाळेच्या गेट जवळ अडवून विनयभंग केल्याने एका विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शाळेत जात असतांना शाळेच्या गेटजवळ पिडीतेचा आरोपीने वाईट हेतूने पाठलाग केला. पीडित मुलीला शाळेच्या गेट जवळ अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो. आपण दोघे पळून लग्न करू असे बोलून पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. पीडितीच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश सुनील माळी (रा. बाजरंगपुरा, बोदवड) याच्यावर बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोदवड उपपोलिस निरीक्षक भाईदास मालचे करीत आहे. या वर्षात बाललैगिक अत्याचाराचे चार गुन्हे नोंद झाले आहेत. बाजारात रस्त्यावरून जातांना शाळा, महाविद्यालयीन मुलीची छेड काढणे अश्या प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे.

Protected Content