महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या; सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । देशात तसेच उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी महिलांवरील व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत. अत्याचार प्रकरणातील दोषी नराधमांना  फाशी द्यावी, अशी मागणी जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रपती आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

उत्तर प्रदेश, बिहार आणि देशातील विविध भागांमध्ये महिला आणि मुलींवर अत्याचार करून त्यांना जीवे ठार मारण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अशा  घटनेतील दोषी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. बिहारमध्ये अल्पसंख्याक तर  उत्तरपदेशमध्ये दलित संवर्गातील मुलींना जाळून मारण्यात आले हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. निवेदन देतांना काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख, अलफैझ फाउंडेशनचे मुश्ताक सालार, अमन फौंडेशनचे सैयद शाहिद, कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी, मौलाना आझाद फाउंडेशनचे फिरोज शेख, फैज ए तालीम फाउंडेशनचे जुबेर खान, फारुख अहलेकार, पठाण आसिफ खान, जमीर खान, रिजवाना सालार, रईस शेख, तौसिफ़ शेख, गुलरींना सालार, ए.जी. कुलकर्णी, शाहीन अख्तर, आयेशा खान, शबाना खाटीक, कहेकाशा अंजुम आदी उपस्थित होते.

Protected Content