उटखेडा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना आदरांजली

यावल प्रतिनिधी । उटखेडा तालुका रावेर या गावात आदिवासींचे जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.                          

उटखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातुन आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमास गावातील व परिसरातील आदीवासी बांधव व समाजातील सामाजीक कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने या प्रसंगी उपास्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजु तडवी यांनी आदीवासींचे क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पाजंली अपर्ण करून अभिवादन केले.

यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रौनक तडवी रावेर तालुका अध्यक्ष महेमुद तडवी व शिक्षक फिरोज तडवी, सलीम तडवी, उटखेडा ग्राम पंचायतचे सदस्य बिस्मिल्ला तडवी, महेमुद तडवी, नसिरुद्दीन तडवी, बाबु तडवी, साजिद तडवी, मोहम्मद तडवी व आदी समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.

 

Protected Content