यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी यावल शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी युसुफ शेख इस्माईल यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या वेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हाजी युसुफ शेख इस्माईल यांच्या निवडीचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अतुल पाटील, विजय पाटील, अ सईद शेख, एम बी तडवी, अनिल साठे, ललित पाटील, राकेश कोलते, वसंत पाटील, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, अयुब खान, अन्वर खान, शहर अध्यक्ष अनवर खाटीक, अन्सार खान, मोहसीन खान, युवा अध्यक्ष पवन पाटील, किरण पाटील, मयुर पाटील, समाधान पाटील, अरुण लोखंडे, कामराज घारु, हितेश गजरे, किशोर माळी, सोनू पाटील, ललित पाटील खेडी, आरिफ तडवी, सद्दाम शेख, आबिद कच्छी, एजाज मन्यार, जाहिद कुरेशी, जुनैद शेख आदींनी स्वागत केले आहे.
हाजी युसुफ शेख इस्माईल यांनी सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावल तालुक्यात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.