जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l भारतीय जनता पक्षाने पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्षांसह जळगाव महानगर अध्यक्ष्यांची निवड आज जाहीर केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठे उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आज पक्षाच्या प्रदेश पातळीवरून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. यात पक्षाच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची निवड करण्यात आलेली आहे. पक्षाच्या पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माझी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.र राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर जळगाव महानगर अध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे.
भारतीय जनता पक्षाने दोन मराठा व एक गुजर पदाधिकाऱ्यांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. चंद्रकांत बाविस्कर यांनी जामनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असून ते गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दीपक सूर्यवंशी यांनी याआधी देखील महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.