धरणगावच्या सारजाई व बालकवी शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल !

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेने यावर्षीही आपली शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा जपली आहे. शाळेतून एकूण २८५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि त्या सर्वांनीच यश संपादन केले आहे.

या नेत्रदीपक निकालात कु. नंदिनी राकेश पवार हिने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. युक्ती ईश्वर महाजन ९७.८० टक्के गुणांसह द्वितीय आणि कल्पेश नंदकिशोर जाधव ९७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिला. विशेष बाब म्हणजे, शाळेतील तब्बल ८९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

या शानदार यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, सचिव ललितजी उपासनी आणि संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, संस्थेचे मार्गदर्शक प्रा. रमेश महाजन, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील आणि बालकमंदिर विभागाच्या प्रमुख मीनाक्षी वारुळे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकांनीही या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या या सातत्यपूर्ण यशामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.