गुणरत्न सदावर्ते म्हणतात, दैनिक सामनावर बंदी घाला !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या विविध वक्तव्यांनी चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता थेट दैनिक सामनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणारे दैनिक सामना हे नेहमीच चर्चेत असते. यात पक्षाची नेहमी अधिकृत भूमिका मांडलेली असते. यामुळे सामनातील अग्रलेख आणि अन्य स्तंभांवरून अनेकदा बातम्या बनत असतात. आता मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी थेट याच वर्तमानपत्रावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संदर्भात टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, एसटी कर्मचार्‍यांच्या संपानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी दैनिक सामनावर बंदी घालण्याची मागणी केली दैनिक सामनामधून अप्रत्यक्षरित्या रश्मी शुक्ला यांचं खच्चीकरण होत असल्याचं कारण दिलंय. यासंदर्भात आरएनआय कार्यालयाकडं लिहित आहोत. त्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार करत आहोत. राज्यातील गृह मंत्रालयानं याबाबत दखल घ्यावी, अशी मागणही सदावर्ते यांनी केली आहे. अर्थात, ते दैनिक सामनाच्या विरोधात आरएनआयकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे. राहुल गांधी यांनी काल एक ट्वीट केलं. ते असं होतं, पाकिस्तानविरोधातला सामना किती थरारक होता. दबावात हा विजय मिळविला गेला, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. यावरून दबावात विजय यावर सदावर्ते यांचा आक्षेप आहे.

Protected Content