यावल तालुक्यात आनंदाचा किट वितरणास विलंब

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यात नव्याने सत्ता स्थापन केलेल्या शिंदे सरकारच्या वतीने राज्यातील सर्वसामान्य परिवाराची दिवाळी यंदा गोड व्हावी, या हेतु जाहीर केलेल्या १०० रूपयांमध्ये आनंदाचा शिधा किट तालुक्यातील नागरीकांना मात्र उद्यावर दिवाळी आली असतांना अद्यापपर्यंत किट वितरण न केल्याने तर काही धान्य दुकानावर साखर विनाच किट वाटप झाल्याची माहीती समोर येत असुन, महसुल शासनाच्या अशा कारभारावर नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीचे शासन हे नाटकीय घडामोडी नंतर पायउतार झाल्यावर साधारण तिन महीन्यापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकार स्थापन झाले , याच काळात मध्यंतरी शासनाच्या वतीने विविध घोषणाचे पाऊस झाले. यात दिवाळीच्या सणासाठी सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतु शासनाच्या वतीने शिधापत्रीकाधारकांना दिवाळीपुर्वी स्वस्त धान्य दुकानातुन १०० रुपयांमध्ये एक किलो साखर , एक किलो पामतेल, एक किलो चनादाळ आणी एक किलो रवा अशा चार वस्तु मिळणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र यावल तालुक्यात आदीवासी अतिदुर्गम भागासह सुमारे १ooच्यावर स्वस्त धान्य दुकाने असुन , शासनाने जाहीर केलेल्या आनंदाचा किट उद्यावर दिवाळी येवुन ठेपल्यावर सुद्धा एकाही शिधापत्रक धारकास १०० रूपयाचे किट न मिळाल्याने सर्वसामान्य नागरीकांमध्ये शिंदे सरकारने घोषणा केलेले हे आनंदाचा किट निव्वळ पोकळ घोषणा तर नाही ? अशी शंका नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असुन राज्य शासनाच्या व महसुलच्या कारभारा बद्दल उघड उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात तहसीलदार महेश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला मात्र संपर्क होवु शकले नाही , तालुका पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमुळे यांच्या भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधुन झालेल्या माहीती देवुन त्यांनी किट साहीत्य उशीरा प्राप्त झाल्याने व त्यात साखरेचा पुरवठा कमी असल्याने किट वाटपास विलंब होत असल्याची माहीती देत काही ठीकाणी हे शिधा किट वितरीत करण्यात आल्याचे पुरवठा निरिक्षक यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले .

Protected Content