नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दुपारी होणार्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. यात गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आधीच हिमाचल प्रदेशात निवडणूक जाहीर केली आहे. या पाठोपाठ गुजरातमध्येही मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुजरातमध्ये प्रदीर्घ काळापासून भाजपची सत्ता असली तरी या निवडणुकीत भाजपला कॉंग्रेस आणि आपकडून मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. गुजरातच्या निवडणुकीच्या निकालावर आगामी काळातील बर्याचशा राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहेत. यामुळे गुजरातची निवडणूक महत्वाची मानली जात आहे.