‘गद्दार’ घोषणेचा राग : खा. भावना गवळींची फिर्याद; राऊत व देशमुखांच्या विरोधात गुन्हा

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रेल्वे स्थानकावर गद्दार. . .गद्दार अशा घोषणा दिल्याच्या कारणावरून खासदार भावना गवळी यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविल्याचे खासदार व आमदारांसह शिवसेना-उबाठा पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला रेल्वे स्थानकावर काल रात्री नऊच्या सुमारास शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले असतांना जोरदार घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला होता. यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळींसमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केलीय. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली.

दरम्यान, खासदार भावना गवळी यांनी अकोला लोहमार्ग पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या फिर्यादीत त्यांनी खासदार विनायक राऊत आणि बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे काल माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली, असा आरोप केला होता. या अनुषंगाने खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहरप्रमुख अतूल पवनीकर यांच्यासह नऊ जण तसेच अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Protected Content