अमानुष मारहाण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांबाबत भाजयुमोचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । धुळे येथे विद्यार्थ्यांना केलेली अमानुष मारहाण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोना मुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या २०२०-२१ चा शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे, अशा रास्त मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पालकमंत्र्यांचा उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली.

गोरगरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध नोंदविला व अशा निष्क्रिय पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.

आमदार तथा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, भाजपा जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे, महेश जोशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, यांच्याहस्ते जिल्हाधिकारी यांना कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालकीची झाली आहे.

याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे ३०टक्के शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे आणि अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रत करावे या विषयांचे निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरचिटणीस-अक्षय जेजुरकर, महेश पाटील, मीलिंद चौधरी, उपाध्यक्ष-सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार चिटणीस- रोहित सोनवणे, अश्विन सैंदाने, प्रसिध्दी प्रमुख- गौरव पाटील, पुष्पेंद्र जोश, ऋषिकेश येवले, गौरव येवले, पंकज सणानसे, चेतन बढे, जयंत चव्हाण, देवेश जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content