मग अनधिकृत सरकारची जाहिरात कशी चालते ? : मनसेचा खोचक सवाल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर आज छापून आलेल्या जाहिरातीवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खोचक प्रश्‍न विचारला आहे.

दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर राज्य सरकारची जाहिरात छापून आली आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्ष एका वर्षात ७५,००० रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, याची ही जाहिरात आहे. दरम्यान, सामनाच्या पहिल्या पानावर ही जाहिरात छापून आल्याने सोशल मीडियात यावरून जोरदार चर्चा सुरू असतांनाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून ठाकरे गटावर टीका केली आहे.

या संदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, खोके सामनामध्ये पोहोचले का?, सामनाचं खरं स्वरुप लोकांसमोर आलं आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात हे अनधिकृत सरकार आहे. मग या अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात सामनात कशी? सर्व तत्त्वे बाजूला करतो आणि पैसे गोळा करतो हेच या जाहिरातीतून सिद्ध होत आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

 

 

 

Protected Content