एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल पंचायत समिती अंतर्गत येत्या मंगळवारी, २७ मे रोजी तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान पंचायत समितीच्या सभागृहात ही सभा पार पडेल. जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत या तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
एरंडोल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दादाजी जाधव यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन या सभेला उपस्थित राहावे आणि आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे या सभेत निराकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.