धनाजी नाना महाविद्यालयात साने गुरुजी यांना अभिवादन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर राष्ट्रीय सण उत्सव समितीतर्फे २४ डिसेंबर रोजी पू. साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. एम. टी. फिरके यांची विशेष उपस्थिती होती.

माल्यार्पणानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे यांनी साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे, डॉ. एस व्ही जाधव, सन महोत्सव समिती चेअरमन डॉ. दीपक सूर्यवंशी व समिती सदस्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content