प्रत्येक वस्तू खरेदी करताना चिंतन व विचार करून घ्यावी – विकास कोटेचा

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था व प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. ऑन लाईन मार्केटिंगमध्ये सध्या ग्रेड वन, टू,किंवा थ्री या दर्जाच्या वस्तू ची विक्री न करता ग्रेड फोर विक्री करून ऑन लाईन वाले फायदे घेत आहे. डी. मार्ट मधील वस्तू व छोट्या दुकानातील वस्तूच्या पॅकिंग मधील व वजनातील फरकप्रत्येक वस्तू खरेदी करताना चिंतन व विचार करून घ्यावी. एकावर एक फ्री अश्या वस्तू खरेदी करू नये जेवढी गरज आहे तेवढीच वस्तू खरेदी करावी. स्थानिक व्यापारी, दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करावी.

ऑन लाईन मार्केटिंगमध्ये मध्ये फसवणुकीची शक्यता जास्त असते, असे आवाहन राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास कोटेचा,सचिव बोदवड एज्युकेशन सोसायटी तथा प्रगतशील शेतीनिष्ट शेतकरी यांनी सांगितले .सर्व प्रथम बी. आर .गायकवाड ,पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय बोदवड यांनी ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्ताविक केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विकास कोटेचा, सचिव ,बोदवड एज्युकेशन सोसायटी, गोपाल अग्रवाल,व्यापारी संघटना अध्यक्ष बोदवड तालुका, गोपीचंद सुरवाडे ग्राहक कल्याण फाउंडेशन अध्यक्ष तालुका बोदवड.महेंद्र पाटील जेष्ठ पत्रकार,संजय अग्रवाल , अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष, अनिल नाडेकर,नायब तहसीलदार,बोदवड उपस्थीत होते , गोपाल अग्रवाल व्यापारी संघटना अध्यक्ष, महेंद्र पाटील जेष्ठ पत्रकार, गोपीचंद सुरवाडे ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुका अध्यक्ष ,अनिल ना डेकर नायब तहसीलदार यांनी ग्राहक दिना निमित्त मनोगत व्यक्त केले. करुणा बडगे ,पुरवठा निरीक्षक तहसीलदार कार्यालय यांनी आभार मानले. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी,विद्यार्थिनी डॉ .प्रा.मनोज निकाळजे ,चेतन पालवे , गोदाम व्यवस्थापक,श्री भावसार ,मेयरर्शिंग राजपूत ,पुंडलिक पाटील ,बाजीराव बोदडे, मनू महाजन ,श्री वर्मा , व नागरिक, उपस्थीत होते.हा कार्यक्रम सुनंदा नारायण चौधरी सभागृह कला वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्र गीताने करण्यात आला.

Protected Content