लहुजी संघर्ष सेनेतर्फे अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । लहुजी संघर्ष सेनेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ५२ वी पुण्यतिथी पाचोरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी आ.किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, रा.काँ. जिल्हा प्रवक्ते खलिल देशमुख, तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील, कृ. उ. बा. प्रशासक रणजित पाटील, नगरसेवक राम केसवानी, बापु हटकर, प्रविण ब्राम्हणे, भगवान मिस्तरी सह मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

वरखेडी रोड वरील श्रीराम चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ५२ वी पुण्यतिथी लहुजी संघर्ष सेनेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दलित समाजाच्या गोर गरीब विद्यार्थी व चिमुकल्यांना उपस्थितांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी लहुजी संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष नाना भालेराव, महाराष्ट्र युवा अध्यक्ष स्वप्निल सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवराज थोरात, उ. मा. उपाध्यक्ष सुभाष पगारे, उ. मा. सचिव सुकदेव आव्हाड, जिल्हा सल्लागार राजेंद्र चव्हाण, राज्य उपाध्यक्ष अण्णा कांबळे, ज्येष्ठ नेते मधुकर अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष बापु कांबळे, पाचोरा तालुका अध्यक्ष पांडुरंग अवघडे, तालुका सल्लागार समाधान बोराडे, जिल्हा कार्य उपाध्यक्ष ईश्वर अहिरे, सोयगाव तालुका अध्यक्ष अनिल शिंदे, युवा अध्यक्ष दिपक गायकवाड (जामनेर),  जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार (जामनेर), तालुका उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, शहर अध्यक्ष गोपाल अहिरे सह लहुजी संघर्ष सेनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथीचे औचित्य साधत लहुजी संघर्ष सेनेच्या नविन पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती पत्र देवुन निवड करण्यात आली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!