३ लाखांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहुन ३ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी नगरदेवळा येथील माहेरवाशिणीचा उपलखेडा ता. सोयगाव येथील सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नगरदेवळा येथील असना परविन हिचा विवाह उपलखेडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद येथील असीफ अली लियाकत अली यांचेशी झाला होता. लग्नानंतरच सासरच्या मंडळींकडुन माहेरहुन ३ लाख रुपये आणावे या मागणीसाठी असना परविन हिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर असना परविन असीफ अली सैय्यद हिने पाचोरा पोलिस स्टेशन गाठत असिफ अली लियाकत अली (पती), लियाकत अली भिकन अली (सासरे), सलमाबी लियाकत अली (सासु), शराफत अली लियाकत अली (दिर) सर्व रा. उपलखेडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद, साजेराबी शेख जावेद (नणंद), जावेद शेख मुस्ताक रा. रतनजी नगर, जंगलशहा बाबा दर्गा, गल्ली नं. १, घर क्रं. ११, सुरत (गुजरात), शाहीस्ताबी अलीन शेख रा. शिंदाड ता. पाचोरा, जि. जळगांव या ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील हे करीत आहे.

Protected Content