भुसावळ ते पंढरपूर मुक्ताई एक्सप्रेस रेल्वे सुरू करा : रावसाहेब दानवे यांना साकडे

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी डेली रेल्वे गाडी सुरू करावी ही मागणी जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय रेल्वे मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्याकडे वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

 

केंद्रीय रेल्वे मंत्री ना. रावसाहेब दानवे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता भुसावळ ते पंढरपूर मुक्ताई एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने डिगंबर महाराज मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केली. याबाबत एक शिष्टमंडळाने हे निवेदन खासदार रक्षाताई खडसे, ना.गिरिषभाऊ महाजन, जिल्हा अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांचे नेतृत्वाखाली ना.रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंढरपूर येथे संपूर्ण खान्देश मधून हजारो भाविक-भक्त जात असतात. तसेच आदिशक्ती मुक्ताई व गजानन महाराज शेगाव येथे महाराष्ट्र मधून हजारो भाविक दर्शनाला येतात. परंतु भुसावळ या जंक्शन रेल्वे स्टेशनवरून थेट रेल्वे गाडी नसल्याने भाविकांची व इतर प्रवासी वर्गाची प्रचंड गैर सोय होत आहे. ही बाब उपस्थित ना.गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, विश्वस्थ शरद महाजन यांनी ना.रावसाहेब दानवे यांचे कडे सादर करून भुसावळ ते पंढरपूर ही गाडी (मुक्ताई एक्सप्रेस) या नावाने सुरू करणेबाबत साकडे घातले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सरचिटणीस विलास चौधरी, प्रदेश प्रतिनिधी हर्षल पाटील, पुरुजीत चौधरी, उमेश फेगडे, उज्जेन्सिंग राजपूत,शेखर भागवत चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हजारो सह्यांचे निवेदन ना.रावसाहेब दानवे यांना दिले.

Protected Content