अमळनेरात गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतातील सर्वात कठीण जेईई मेन्स परीक्षेत कृष्णा पाटील व नीट परीक्षेत कुमुद देसले व शिशिर पाटील यांनी दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचा व पालकांचा ॲड. ललिता पाटील यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई या परीक्षांसाठी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेमार्फत गेल्या तीन वर्षापासून मार्गदर्शन केंद्र व फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे.

नीट व जेईई या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते व खूप फीज भरावी लागते त्यासाठी ॲड ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी फीजमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट मार्गदर्शन केंद्र चोपडा रोड येथे स्थापना केली आहे.

भविष्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात कीर्तीवंत डॉक्टर्स व इंजिनियर्स व्हावेत, यासाठी ॲड ललिता पाटील यांचा मानस आहे.

Protected Content