अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलगी मावशी व मावसासह वस्तव्याला आहे. सोमवारी १७ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान मुलगी शिवण क्लासला जावून येते असे सांगून गेली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत अल्पवयीन मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतू कोठे ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडीलांना फैजपूर पोलीसात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी १८ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख हे करीत आहे.

Protected Content