डांभुर्णीत कोरोना संशयित चिमुकलीचा मृत्यू; कुटूंब विलगीकरण कक्षात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथे कोरोना संशयीत तीन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मयत झालेल्या मुलीच्या कुटुंबास फैजपुरात विलगीकरणा कक्षात ठेवण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे रविवार १७ मे रोजी एका तीन महीन्याच्या बालीकेचा मृत्यू झाला. मरण पावलेला बालिकचे मामा हे काही दिवसापुर्वी पुणे येथुन आपल्या घरी आले होते. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. सदरही तिन महीन्याचे लहान बाळ मामाच्या संर्पकात आले असावा असा संशय व्यक्‍त केला जात आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने मरण पावलेल्या बालीकेचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात त्या तीन महीन्याच्या बालीकेला मागील तीन दिवसापुर्वी तिला सर्दी, खोकला, ताप असे प्रथम तपासात दिसून आल्याचे किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मानिषा महाजन यांनी सांगीतले. दरम्यान त्या तिन महीन्याच्या बालीकेचा अंत्यविधी करण्यात आले आहे.

Protected Content