शिवाजी नगरातून बकऱ्यांची चोरी करणाऱ्या दोन भामट्यांना अमळनेरातून अटक

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे आणि हमालवाडा येथून अज्ञात चोरट्यांनी एकुण १३ बकऱ्यांची चोरी केल्याचा प्रकार ८ जुलै रोजी उघडकीला आले होते. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना शहर पोलीसांनी अमळनेरातून काल शनिवारी १७ जुलै रोजी सायंकाळी अटक केली आहे. आज रविवारी न्यायालयाने दोघांना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

जुबेर भिकन शेख (वय-२१) रा. गेंदालाल मिल आणि गौरव जगन कोळी (वय-२०) रा. शिवाजी नगर असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहे. 

याबाबत माहिती अशी की, कानळदा रोडवरील धनाजी काळे नगरातून वाल्मिक प्रभाकर वाघ (वय-४०) व राजू गणपत चौरे यांच्या प्रत्येकी दोन असे एकुण चार बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे बुधवार ८ जुलै रोजी सकाळी उघडकी आले. ही घटना जाती असतांना पुन्हा शिवाजी नगरातील हमालवाडा येथी पाच जणांच्या ९ बकऱ्या चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.. धर्मेंद्र अंकुश चौधरी यांच्या मालकीच्या ३, किशोर गणपत गायकवाड यांच्या मालकीची एक, सुलताबाई नामदेव लोहार यांच्या मालकीच्या दोन, अजय राजेंद्र जगताप यांच्या दोन व नंदा बापू शेळके यांच्या बकऱ्या चोरी गेल्या होत्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होत. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी हे अमळनेर शहरात आल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी किशोन निकुंभ, रतन गिते, गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, विजय निकुंभ यांनी अमळनेरातून संशयित आरोपी जुबेर शेख आणि गौरव कोळी यांना काल शनिवारी १७ जुलै अटक केली. आज रविवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. प्रफुल्ल धांडे करीत आहे.  

Protected Content