भारतीय संविधान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लोकनियुक्त सरकारचे अधिकार मान्य केले तरी, राज्यघटना अढळ ध्रुव ताऱ्यासारखी आहे. शासनाची प्रत्येक कृती किंवा कृतिहीनता यांची योग्यायोग्यता संविधानातील निकषांवरच ठरविता येते, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्या धनंजय चंद्रचूड यांनी केले.

 

आपल्या संविधानाने दिलेल्या  मूलभूत अधिकारांच्या   हमीच्या पाश्र्वाभूमीवर बहुसंख्याकवादी प्रवृत्तींबाबत प्रश्न उपस्थित करायला हवेत, असेही न्या. चंद्रचूड यांनी नमूद केले.

 

‘घटनेचे आघाडीचे सैनिक म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका’ या विषयावर शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात न्या. चंद्रचूड बोलत होते. महाराष्ट्रातील ही संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात काम करते. न्या.  धनंजय चंद्रचूड यांचे वडील आणि सर्वाधिक काळ देशाचे सरन्यायाधीश राहिलेले न्या. यशवंत चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

अधिकारवाद, नागरिकांच्या स्वातंर्त्यांची गळचेपी, लिंगभाववाद, जातीवाद, धर्म किंवा प्रांत या आधारे केला जाणारा भेदभाव नष्ट करण्याचे पवित्र वचन आम्हाला दिले  गेले आहे. देशाला संवैधानिक संघराज्याच्या स्वरूपात स्वीकारणाऱ्या आपल्या पूर्वजांनी ते आपल्याला दिले आहे, असे न्या. चंद्रचूड यांनी यावेळी अधोरेखित केले.

 

Protected Content