रिफॉर्मेशन कपचा शानदार समारोप, मिर्झा ब्रदर्स यादगार लायन संघाने मारली बाजी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । मुस्लीम समाजातील युवकांना एकत्र करीत त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला वाव देण्याच्या हेतूने प्रेरित रिफॉर्मेशन कपच्या दुसऱ्या पर्वाचा रविवारी समारोप करण्यात आला. अंतीम सामन्यात नॅशनल मोटर ११ विरुद्ध मिर्झा ब्रदर्स यादगार लायन संघाने विजय मिळवत विजयी चषकावर आपले नाव कोरले. अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली.

मुस्लीम समाजातील ११ युवकांनी एकत्र येत गेल्यावर्षी युवकांना जोडण्यासाठी आणि समाज प्रबोधनाच्या हेतूने रिफॉर्मेशन कप या क्रिकेट सामन्याची संकल्पना मांडली होती. आयपीएल प्रमाणे खेळाडूंचा लिलाव आणि संघ प्रायोजकत्व अशी पद्धत असलेल्या स्पर्धेत दरवर्षी एक नवीन संकल्प ठेवत त्यावर प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी नशामुक्त समाज या विषयावर तर यंदा आत्महत्यामुक्त समाज या विषयावर प्रबोधन करण्यात आले.

युवा दिनाचे औचित्य साधून शिवतीर्थ मैदानावर क्रीडा सामन्यांना सुरुवात झाली होती. स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले तर प्रत्येक संघाचे ३ सामने झाले. उत्कृष्ट प्रकाश यंत्रणा, खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी, आवाज आणि समालोचक, लाईव्ह स्ट्रिमिंग अशा विविध सुविधा स्पर्धेठिकाणी देण्यात आले.

तीन दिवस स्पर्धेचा अंतीम सामना मिर्झा ब्रदर्स यादगार लायन व नॅशनल मोटर ११ या संघात खेळवण्यात आला असता मिर्झा ब्रदर्स यादगार लायन संघाने विजय मिळवला. सर्व विजेते संघ आणि स्पर्धकांना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार, मजीद जकरिया, इब्राहिम पटेल, अब्दुल अजीज सालार, एजाज़ मालिक, डॉ.रागिब जहागीरदार, कादर टिक्की, डॉ. मोइज देशपांडे, हारून पटेल, फारूक शेख, वसीम बापू, खलील शेख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीतील रेहान खाटीक, शारीक शेख, आसिफ मिर्झा, आसिफ देशमुख, जकी अहमद, आमिर शेख, आमिर गोल्डन, शोएब बागवान, अलफैज पटेल, शोएब खान, अजहर खान यांच्यासह इतर सदस्य परिश्रम घेतले. स्पर्धेचे समालोचन आसिफ मिर्झा, अलफैज पटेल, अलताफ रेहनुमा, अयाज मोहसीन यांनी केले. तसेच सूत्र संचालन आसिफ मिर्झा तर आभार रेहान खाटीक यांनी मानले. पंच म्हणून साद शेख, पवन तायडे, मनीष चौबे, यश सोनवणे यांनी काम पाहिले.

Protected Content