विषारी औषध घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील भोद येथील ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरात विषारी औषध सेवने केल्याची घटना ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील भोद येथे अरूणाबाई शरद पाटील वय-४५ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घरात असतांना त्यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.

Protected Content