दारूसाठी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा

 

जळगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी उसनवार 50 रूपये दिले नाही म्हणून दारू पिऊन शिवीगाळ व हातावर काचेचा ग्लास फोडणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्याची साधी कैदेची शिक्षा आणि दंड अशी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोपी नारायण पाटील यांने फिर्यादी संतोष बाबुराव माळी रा. नशिराबाद यांच्याकडे 6 सप्टेंबर 2012 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमार बसस्थानकाजवळ दारू पिण्यासाठी 50 रूपये मागितले. मात्र संतोष माळी यांने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी नारायण पाटील यांने दारू पिऊ शिवीगाळ आणि काचेचा ग्लास फोडून फुटलेल्या ग्लासने संतोष माळी यांच्या उजव्या हाताला जखमी केले. याबाबत संतोष माळी यांच्या फिर्यादीवरून नशीराबाद पोलीसात आरोपी नारायण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी निळकंठ बंडू महाजन यांनी गुन्ह्याचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर प्रत्यक्ष साक्षीदार, पंच, वैद्यकिय अधिकारी व फिर्यादीवरून नारायण पाटील याला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत त्याला तीन महिन्याची साधी कैद आणि 1500 रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Add Comment

Protected Content