भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भडगावात भव्य तिरंगा यात्रा

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दिमाखदार यशानंतर भारतीय सेनेचा सन्मान करण्यासाठी आणि सीमेच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ आज भडगाव येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ही सर्वपक्षीय यात्रा होती, ज्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

या गौरवशाली यात्रेत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन, आपण सर्व भारतीय वीर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे दर्शवून दिले. भडगाव तालुक्यातील नागरिकांनीही या यात्रेत मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.

बाजार चौक येथून निघालेली ही तिरंगा यात्रा नगरपरिषद, मेन रोड मार्गे मारुती मंदिर आणि शहीद जवान स्मारकावरून तहसील कार्यालयापर्यंत पोहोचली, जिथे तिचा समारोप झाला. या यात्रेतून ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सेनेने दाखवलेल्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यात आले. तसेच, देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Protected Content