अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त पादुका आणि श्रीलालजी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
खान्देश चे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आज सकाळी ६ वा. प्रज्वल देव यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन पालखी निघाली. या पालखीचे वैशिठ्य म्हणजे गादीपती प्रसाद महाराज हे मे हीटमध्ये अनवाणी मिरवणुकीत सहभागी होतात.
श्रीलालजींच्या पालखीच्या मिरवणुकीत टाळ मृदंगांच्या गजरात अभंग बॅँण्ड पथकांकडून चौकाचौकात अभंगांचे गायन करण्यात आले. या पालखीच्या आधी छोटा रथ नगारखाना, भालदार चोपदार, महिला ढोल व लेझीम पथक, तर मागे संत सखाराम महाराजांच्या पादूका, व अनवाणी तप्त उन्हात चालणारे ह.भ.प. प्रसाद महाराज अशी मिरवणूक आगेकूच करीत होती, ही मिरवणूक वाडी संस्थानापासून निघते. त्यानंतर पारंपारिक नागरीकांच्या घरी ते तीर्थप्रसादासाठी विसावा घेत,पुन्हा मार्गस्थ होत असते. मिरवणूकत ग्रामीण व शहरी भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात.
दरम्यान, पालखी मार्गात ठिक ठिकाणी भाविकांसाठी थंड पाण्याचे जार, शरबत अशी व्यवस्था प्रतिष्ठीत व्यापारी व मित्रमंडळानी केली होती. त्यात काही मित्रमंडळ यांनी नासत्याची सोय केली होती. काही ठिकाणी सरबत ताकाचे देखील वाटप करण्यात येत होते तर बाहरेगावाहून येणार्यांसाठी अन्नछत्रही संस्थाणात सुरु होते तसेच काहींनी स्वतंत्र भंडारा आयोजन केले आहे. यामुळे भाविकांना मोठा आधार लाभला बाजारातून, दगडी दरवाजा, फरशी रस्ता, पैलाड भागातून रात्री ९ वाजता मुळ संस्थानात येऊन विसर्जित होते. गेल्या दोन वर्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा बंद होती यावर्षी मात्र भाविकांचा उत्साह शिगेला होता.
खान्देशात सुरु असलेल्या यात्रोत्सवाचा शेवट करणारी ही शेवटची यात्रा म्हटली जाते. या यात्रेचे वैशिठ्य असे आहे की, ग्रामीण भाग तसेच धुळे, नंदुरबार येथीलही भाविक रथ व पालखी उत्सवास आवर्जन हजेरी लावत दर्शन घेत होते. त्यानंतर शेतकरी वर्ग आपल्या शेतीकामांध्ये व्यस्त होतो. यावेळी पोलीस प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त लावलेला होता.