जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १२ जानेवारी रेाजी सकाळी ९ वाजता शहरातील नगरपालिका चौकामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरपालिका घटनेचे डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, प्रा. शरद पाटील, सुहास पाटील, उल्हास पाटील, सुधाकर माळी, रवींद्र झालटे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, इंग्लिश मीडियम स्कूलचे उदय पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तसेच नगरपालिकामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. शहरातून विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्यासह महापुरुषाचे सजीव आरास चिमुकल्यांनी करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.