Home Cities एरंडोल महिलेच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत

महिलेच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील वृंदावन नगरात घरगुती भांडणाच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देत लोखंडी वस्तूने डोक्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कीर्ती किरण पाटील (वय-४०, रा.वृन्दावन नगर, एरंडोल) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरगुती भांडणाच्या कारणावरून किरण अशोक पाटील रा. जहांगीरपुरा एरंडोल याने महिलेला शिवीगाळ करून जीवेठार मानाची धमकी दिली. तसेच त्याच्या हातातील लोखंडी वस्तू महिलेच्या डोक्यात मारून गंभीरज दुखापत केल्याची घटना घडली. महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर महिलेने दिलेल्या जबाब आवरून संशयित आरोपी किरण अशोक पाटील रा. जहांगीरपुरा, एरंडोल यांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील लोहार करीत आहे.


Protected Content

Play sound